कथित प्रकरणावर आमदार रोहित पवार म्हणाले… CBI चौकशीत राजकारण नको

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-महाविकास आघाडी सरकारमधील नेते मंडळी सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहे.

यातच नुकत्याच आरोपांच्या फेऱ्यात अडकलेले राज्याचे माज़ीगृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

आता या प्रकरणावर आमदार रोहित पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या दिलेल्या निर्णयाचा मान ठेवूनअनिल देशमुख यांनी राजीनामा दिला.

आता सीबीआय चौकशीत तरी राजकारण होता कामा नये. त्यावर न्यायालयाचेही लक्ष असेल अशी अपेक्षा करूया, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.

कर्जत जवळील गायकरवाडी येथे पवार आले असता पत्रकारांनी पवार यांना मंत्री देशमुख यांचा राजीनामा व सीबीआय चौकशीचा आदेश यासंबंधी विचारले असता पवार म्हणाले,

‘तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांनी राजीनामा विरोधकांच्या आरोपांमुळे दिलेला नाही, तर न्यायालयाने चौकशीचा आदेश दिल्यानंतर आहे.

विरोधक नेहमीच आरोप करीत आले आहेत. त्यांच्या केवळ आरोपांना महत्त्व देण्याचे कारण नाही. ज्यांनी आरोप केले,

ते मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीरसिंग याचाही मुद्दा राहिला नाही, तर अॅड. जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे.

ही चौकशी सुरळीत व्हावी, यासाठी राजीनामा देणे उचित वाटल्याने हे पाऊल उचलण्यात आले. मात्र, आता सीबीआयकडून ही चौकशी नि:पक्षपणे व्हायला हवी.

त्यासाठी या प्रक्रियेवर न्यायालयाचे लक्ष असेल अशी अपेक्षा करू. जर यातही राजकारण आणले गेले तर ते चुकीचे ठरेल,’ असेही पवार म्हणाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24