अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-निमगाव वाघा (ता. नगर) येथील स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निशुल्क ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे व सचिव प्रतिभा डोंगरे यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त गावात घेण्यात येणारे विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना संभाजी महाराजांचे कार्य ज्ञात होऊन त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळण्यासाठी या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे पै. डोंगरे यांनी स्पष्ट केले आहे. सदर स्पर्धा लहान गट (इयत्ता 5 वी ते 8 वी) व मोठा गट (इयत्ता 9 वी ते 12 वी) या दोन गटात होणार आहे.
दोन्ही गटासाठी संभाजी महाराज व आजचा युवक, रणधुरंधर संभाजी महाराज व कला, भाषा, साहित्य भूषण संभाजी महाराज हे तीन विषय देण्यात आले आहे.
निबंध तीनशे ते चारशे शब्दात मंगळवार दि.18 मे पर्यंत प्रवेशिका पोस्टाने पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, निमगाव वाघा, ता.जि. अहमदनगर 414005 या पत्तावर किंवा निबंधाची फाईल पीडीएफ करुन 9226735346 या व्हॉटसअप नंबरवर पाठविता येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होणार्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण नांव, पत्ता, मोबाईल नंबर, पासपोर्ट फोटो व शाळा, महाविद्यालयाचे नांव आपल्या प्रवेशिके सोबत द्यायचे आहे. अंतिम तारखे नंतर तज्ञ शिक्षकांकडून निबंधाचे परीक्षण करुन निकाल जाहीर केला जाणार आहे.
दोन्ही गटातील पहिल्या तीन विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे.