अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 20 फेब्रुवारीला मतदान होवून त्यानंतर लगेच 20 तारखेला मतमोजणी झाली होती.
यामध्ये प्रथमच 21 संचालकांपैकी 17 बिनविरोध तर चार जागांसाठी निवडणूक होवून त्याठिकाणी चौघे संचालक निवडून आलेले आहेत.
निवडणुका पार पडून उमेदवार निवडून देखील आले आहे, आता सगळ्यांचे लक्ष लागून आहे ते म्हणजे बँकेच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी. दरम्यान याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी सभेची नोटीस काढली आहे.
बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ही नोटीस पाठवून 6 मार्चला सभेचे आयोजन करण्याच्या सुचना दिल्या आहेत. यामुळे चेअरमन, व्हाईस चेअरमनपदराच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान यंदाच्या बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडीमध्ये बँकेवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीच्या गटाचे वर्चस्व आहे.
निवडून आलेल्या संचालकांतून जिल्ह्यातील नेत्यांना विश्वासात घेवून सर्व सहमतीने चेअरमन यांची निवड करण्यात येणार असल्याचे यापूर्वी महसूल मंत्री थोरात यांनी जाहीर केले आहे. यामुळे बँकेवर चेअरमन म्हणून कोणाची निवड होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.
दरम्यान यानिवडीसाठी सर्व संचालकांनी 6 मार्चला उपस्थित राहायचे आहे. त्यानूसार 6 मार्च रोजी दुपारी 1 वाजता जिल्हा बँकेच्या चेअरमनची आाणि व्हाईस चेअरमनची निवड होणार आहे.