अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :-राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातून आणखी १,४५६ कोटी ७५ लाख रुपयांचा बंधीत (टाइड) निधी प्राप्त झाला आहे.
हा निधी जिल्हा परिषदांना वर्ग करण्यात येत असून तेथून तत्काळ पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना वितरित करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
या निधीचा वापर करून गावांमध्ये चांगल्या दर्जाच्या पायाभूत सोयी-सुविधांची निर्मिती करण्यात यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातून आणखीन १ हजार ४५६ कोटी ७५ लाख रुपयांचा बंधीत (टाईड) निधी प्राप्त झाल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
हा निधी जिल्हा परिषदांना वर्ग करण्यात येत असून तेथून तत्काळ पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना वितरित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या निधीचा वापर करून गावांमध्ये चांगल्या दर्जाच्या पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती करावी,
असे आवाहनही मुश्रीफ यांनी केले आहे. राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना अनुक्रमे ८०:१०:१० प्रमाणे पंधराव्या वित्त आयोगाचा निधी वितरित करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार वित्तीय वर्ष २०२०-२१ साठी एकूण ५ हजार ८२७ कोटी रुपये निधी मंजूर आहे. यापैकी यापूर्वी ४ हजार ३७० कोटी २५ लाख रुपये इतका निधी प्राप्त झाला होता,
तो जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना वर्ग करण्यात आला आहे, असे मंत्री मुश्रीफ म्हणाले. आता उर्वरित १ हजार ४५६ कोटी ७५ लाख रुपयांचा बंधीत (टाईड) निधी मिळाला असून
यामुळे २०२०-२१ या आर्थिक वर्षात मंजूर असलेला संपूर्ण निधी प्राप्त झाला आहे. आता प्राप्त झालेल्या निधीमधून स्वच्छतेशी संबंधित कामे,
हागणदारीमुक्त स्थानिक स्वराज्य संस्थांची देखभाल आणि दुरुस्ती तसेच पेयजल पाणीपुरवठा, पर्जन्यजल संकलन तसेच पाण्याचा पुनर्वापर यासंदर्भातील कामे करता येऊ शकतील, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.