अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :- पूर्वी केलेला विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तरुणीचा अश्लील व्हीडीओ बनवून तो व्हायरल केला, याप्रकरणी एकास गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
न्यायालयाने आरोपीस ६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. इंटरनेटवरील आधुनिक तंत्रज्ञानाचा त्याने चुकीचा वापर करून हा गुन्हा केला. याप्रकरणी २५ वर्षीय महिलेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
तीनुसार एका जणांविरोधात गुन्हा दाखल आरोपीस अटक केली असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल व सिमकार्ड पोलिसांनी जप्त केले आहे.
तो राहाता येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या घराशेजारी कोपरगाव येथे राहात असलेल्या आरोपीने फिर्यादी महिलेशी ओळख केली.
ते एकमेकांच्या जवळ आले, मात्र त्यानंतर या दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याने महिलेने एक वर्षापूर्वी आरोपीविरोधात विनयभंगाची फिर्याद दिली होती. आरोपीने महिलेच्या फोटोची एक अश्लील व्हीडीओ क्लिप तयार केली.
ही क्लिप दाखवून आरोपी महिलेस विनयभंगाची तक्रार मागे घे, अन्यथा ही क्लिप व्हायरल करेल, अशी धमकी देत होता; पण महिलेने जुमानले नाही,
म्हणून आरोपीने २ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता त्याच्या मोबाईलवर फिर्यादिचा अश्लील फोटोचा व्हीडीओ तयार केला व प्रसारीत केला व महिलेची बदनामी केली.
याबाबत महिलेने कोपरगाव शहर पोलिसांत धाव घेत २ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजता गुन्हा नोंदवला. याप्रकरणी कोपरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले तपास करीत आहेत.