प्राथमिक शिक्षकांनी एक दिवस केले अन्नत्याग

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-कोरोना विरुद्धच्या लढ्यात प्राथमिक शिक्षकांची फ्रंटलाइन वर्कर म्हणून गणना करा व सर्वच शिक्षकांचे लसीकरण करा या मागणीसाठी राहुरी तालुक्यात शिक्षक परिषदेच्या वतीने आत्मक्लेश व अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेपैकी कोणतेही केडर लसीकरणाशिवाय कामकाज करत नाही. प्राथमिक शिक्षकानी नुकतेच माझे कुटुंब माझी जबाबदारी हे सर्वेक्षण घरोघर जाऊन पूर्ण केले.

त्या सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेल्या कर्मचार्यांपैकी फक्त प्राथमिक शिक्षक हा एकच घटक लसीकरणाशिवाय काम करत होता.इतर अनेक जिल्ह्यात शिक्षकांचे प्राधान्याने दोन्ही डोस चे लसीकरण प्राधान्याने पूर्ण केले.मग अहमदनगर जिल्हा प्रशासनानेच याबाबत उदासीनता का दाखवली.

शिक्षकांना लस नाही तर मग काम तरी का दिले जाते? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या गोष्टीचा प्रतिनिधीक निषेध म्हणून अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषदेच्या वतीने एक दिवसाचे आत्मक्लेष व अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.

कोविड १९ महामारीच्या अनुषंगाने सर्व प्राथमिक शिक्षक यांची गणना फ्रंटलाईन वर्कर म्हणून करावी, प्रत्येक तालुक्यात ज्या शिक्षकांचे लसीकरण झालेले नाही.

त्या शिक्षकांचे सरसकट करण्यासाठी तालुकास्तरावर स्वतंत्र एक दिवसाचे लसीकरण सत्र आयोजीत करण्याचे आदेश जिल्हास्तरावरुन पारीत व्हावेत. आदी प्रमुख मागण्या या आंदोलनात करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकत्र येऊन आंदोलन न करता सर्वानी स्वतंत्र आंदोलन केले.आंदोलनाला राहुरीत प्रचंड प्रतिसाद मिळाला .

आंदोलन यशस्वी करण्यासाठी शिक्षक परिषदेचे जिल्हा नेते रवींद्र अरगडे,विभागीय उपाध्यक्ष शंकर गाडेकर,जिल्हा मार्गदर्शक कल्याण राऊत,नगरपालिका शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष अमोल लांबे,मनोज पालवे,बाळासाहेब गोरे, आदी शिक्षक परिषदेच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.

अहमदनगर लाईव्ह 24