नगर – कल्याण रोडवर अपघातात एक ठार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-नगर-कल्याण रोडने भरधाव वेगाज जाणार्‍या कारने पायी चालणार्‍या 55 पादचार्‍यास धडक दिली.

या धडकेत पादचार्‍याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना नगर – कल्याण रोडवरील धोत्रे शिवरामध्ये शुक्रवार दि.26 रोजी सकाळी 9.45 च्या दरम्यान घडली.

माहिती अशी की, नगर कल्याण रोडवर धोत्रे गावच्या शिवारात सोन्याबाप्पू राहिंज (वय 55 वर्ष) रा. धोत्रे हे रोडवर पायी जात असताना भरधाव वेगात आलेल्या (एमएच 43 एबी 6143) या वाहनाने जोराची धडक दिली.

या धडकेत सोन्याबापू राहिज यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच कार चालक घटनास्थळावरुन पसार झाला.

घटनास्थळाच्या परिसरातील नागरीक घटनास्थळी धावले. त्यांनी महामार्ग पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी नागरीकांच्या मदतीने राहिंज यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. या प्रकरणी पोलिसांनी भादवी कलम 304 अ, 289, 337, 338 मोटार वाहन कायदा कलम 184, 134 (अ) (ब) 177 प्रमाणे अपघाताच्या गुन्हयाची नोंद केली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24