अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :- नगर तालुक्यातील विळद येथील रेल्वेस्टेशन येथे भरधाव रेल्वेची धडक बसून एका व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे.

दरम्यान हि धडक इतकी भयंकर होती कि, मयताच्या डोक्याची कवटी देखील फुटली आहे. यामुळे सदर व्यक्तीची ओळख पटू शकली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी कि, रेल्वे पोलिसांनी सांगितले सदर व्यक्ती भरधाव रेल्वेखाली सापडली. यात रेल्वेची जोरदार ठोकर लागून मयताच्या डोक्याची कवटी फुटून चेंदामेंदा झाला.

मोठ्या प्रमाणात रक्त वाहिले. यात संबंधित व्यक्ती जागीच मयत झाली आहे. मयत व्यक्तीचे वर्णन… या मयताची उंची ५ फूट ३ इंच असून, वय अंदाजे ५५ वर्षे असावे.

मयत रंगाने गोरा असून, पांढरी बारीक दाढी व मिशा आहेत. अंगात बदामी रंगाचा उभ्या रेषा असलेला शर्ट आहे. मयताची ओळख पटत नसल्याने तपासात अडथळे येत आहेत.

त्यामुळे वरील वर्णनाची व्यक्ती कोणाच्या ओळखीतील, माहितीतील असल्यास अहमदनगर लोहमार्ग पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.