अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:-भरधाव वेगातील टेम्पोने समोरून येणाऱ्या मोटासायकलला जोराची धडक दिली. यात मोटारसायकलस्वार जबर जखमी होवून त्यातच त्याचा मृत्यू झाला.
ही घटना राशीन कर्जत रोडवरील कोळवाडी शिवारात घडली. श्रीरंग मारूती कांबळे (रा.थेरवाडी ता.कर्जत) असे त्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर असे की,
राशीन कर्जत रोडवरून भरधाव वेगात आलेला आयशर टेम्पो (क्र.एमएच १४ बीजे २७९१) वरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत टेम्पो वेगात चालवून रस्त्याने समोरून येणारी दुचाकी (एमएच १६जे ७६४७) हीला जोराची धडक दिली.
यात मोटारसायकलवरील श्रीरंग मारूती कांबळे (रा.थेरवडी) हे जबर जखमी झाले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात टेम्पोचालकाविरूध्द कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोहेकॉ शेख हे करत आहेत.