अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :- शेवगाव येथील मारूती मंदिराजवळ (माळीवाडा) एका ट्रॅक्टरने मोटारसायकलला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला. सुरेश शंकर सुसे असे अपघातात मृत्यूमुखी पावलेल्या इसमाचे नाव आहे.
दिनेश शंकर सुसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शेवगाव पोलिस ठाण्यात २ एप्रिल रोजी गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी दिनेश सुसे यांचे बंधू सुरेश सुसे हे शेवगावकडून त्यांच्या घरी मोटारसायकलवरून जात असताना समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने (क्र. एम. एच. १६ सी. क्यु. ९८३२) जोराची धडक दिल्याने अपघात झाला.
ही घटना २१ मार्च रोजी घडली होती. अपघातात सुरेश सुसे हे मृत्यूमुखी पावले. पुढील तपास पो. ना. दराडे हे करत आहेत.