अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- ट्रॅक्टरची निघालेली पिन बसवत असताना भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ट्रॅक्टरचालक नानासाहेब तुकाराम डिसले यांचा मृत्यू झाला.

ही घटना जामखेड तालुक्यातील खर्डा येथे घडली. याबाबत सविस्तर असे की, सोनेगाव येथून खर्ड्याकडे ब्लास्टिंगचा ट्रॅक्टर (एमएच-१६ सी ८१५८) हा चालक नानासाहेब तुकाराम डीसले (रा.डीसलेवाडी ता.जामखेड) हे चालवत होते.

अचानक ट्रॅक्टरची खालील पिन निघाली व घासत गेली. त्या वेळी चालक डिसले यांनी ट्रॅक्टर थांबवला व ते बाजूला थांबून पिन बसवण्याचे काम करत होते. यावेळी अचानक समोररून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जारोची धडक दिली.

या धडकेत त्यांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान यावेळी आजुबाजूला कोणीच नव्हते याच संधीचा फायदा घेत तो अज्ञात वाहनचालक वाहनासह पसार झाला आहे.

याबाबत पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शेंडे हे करीत आहेत

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24