टेम्पोची मोटारसायकलला धडक एकजणाचा मृत्यू एक जखमी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:-भरधाव वेगात आलेल्या छोटा हत्ती या टेम्पोने समोरून आलेल्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील एकजणाचा जबर मार लागल्याने मृत्यू झाला तर एकजण जबर जखमी झाला आहे.

धनराज केशव राठोड (वय ३८रा.शनिशिंगणापूर ता.मानोर,जि.वाशीम) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.ही घटना निंबळक चौकात घडली. याबाबत एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात टेम्पोचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर असे की, निंबळक चौकातून धनराज केशव राठोड व महेश राजेश चव्हाण हे दोघेजण मोटारसायकल (क्र.एमएच ३७ झेड १६०८) वरून जात होते.

हे दोघे निंबळक चौकातून जात असताना विळद घाटाकडून भरधाव वेगात आलेल्या छोटा हत्ती या टेम्पोच्या चालकाने हलगर्जीपणा करत टेम्पो चालवून फिर्यादीच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली.

या धडकेत मोटारसायकल चालवणारा धनराज राठोड याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेला महेश राजेश चव्हाण हा जखमी झाला.

याबाबत जखमी चव्हाण यने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात टम्पोचालकाविरूध्द एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोना.सचिन गायकवाड हे करत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24