अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :- कोरोनाची लक्षणे आढळताच विलगीकरण कक्षात दाखल व्हा. बेलापुर केंद्रात दाखल झालेला एकही रुग्ण पुढील उपचारासाठी पाठविले गेलेले नाही.
त्यामुळे कोविड सेंटरमध्ये दाखल व्हा, असे अवाहन उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी केले. बेलापूर येथील मराठी शाळेत सुरू असलेल्या
कोविड सेंटर करिता गौतम हिरण यांच्या स्मरणार्थ पंकज हिरण व शांतीलाल हिरण यांच्या वतीने एक लाख रुपये किमतीची आवश्यक औषधे उपविभागीय अधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या हस्ते भेट देण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, अजय डाकले, कैलास चायल, डॉ. दिलीप शिरसाठ, डॉ. देविदास चोखर, डॉ. सुधीर काळे, रणजित श्रीगोड, सुनील मुथा, देविदास देसाई, किशोर कदम, पोलिस पाटील अशोक प्रधान, राम पोळ, विष्णुपंत डावरे, पुरुषोत्तम भराटे, अकबर टिनमेकरवाले,
साहेबराव वाबळे, सुजित सहानी, रमेश अमोलिक, विशाल आंबेकर, महेश कुऱ्हे, शुभम नवले, संतोष डाकले, महेश ओहोळ, राहुल माळवदे, रोहित शिंदे, सचिन वाघ आदी उपस्थित होते. या वेळी बेलापूर येथील मराठी शाळेत सुरू असलेल्या
कोविड सेंटरला हिरण परिवाराच्या वतीने एक लाख रुपयांची फेबीफ्ल्यू औषधे बेलापूर केमिस्ट व ड्रगिस्ट असोसीएशनच्या वतीने ३१ हजार रुपयांची औषधे शशिकांत दिगंबर उंडे यांच्याकडून रोख अकरा हजार रुपये संदीप डावखर यांच्याकडून अकरा हजार रुपये देगणी देण्यात आली.