Telegram Fraud : तुम्हीही सोशल मीडिया वापरत असाल. या सोशल मीडियावर तुम्ही घरबसल्या बसून पैसे कसे कमवायचे याबाबत जाहिराती पाहिल्या असतील. परंतु, या सर्वच जाहिराती पैसे कमावून देणाऱ्या नसतात. यातील काही जाहिराती केवळ तुमचे बँक खाते रिकामे करणाऱ्या असतात.
अशा जाहिरातीपासून खूप सावध राहणे गरजेचे आहे. तुमची एक चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते. सध्या असेच एक प्रकरण समोर आले आहे. एका महिलेला घरबसल्या पैसे कमावून देण्याच्या बहाण्याने सोशल मीडियावर 10 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे.
जाणून घ्या संपूर्ण प्रकरण?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या महिलेचे नाव शानुप्रिया वर्षाणे असून ती गुरुग्रामची रहिवासी आहे. तिने पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार, या महिलेला 1 फेब्रुवारी रोजी एक व्हॉट्सअॅपवर ऑफर आली होती. ज्यात त्या महिलेला डिजिटल मार्केटिंग गुंतवणूक केल्यास मोठा परतावा दिला जाईल, असे सांगण्यात आले होते. त्यासाठी त्या महिलेला टेलिग्राम अॅपवर यूट्यूब व्हिडिओ पाहून त्याला लाईक करावे लागेल असे देखील सांगण्यात आले होते.
सर्वप्रथम या महिलेला टेलिग्राम ग्रुपमध्ये अॅड केले. पोस्टच्या माध्यमातून युट्यूबवर व्हिडीओ बघून तिला लाईक करायचा होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुरुवातीला या महिलेला व्हिडिओ पाहण्यासाठी आणि लाईक करण्यासाठी काही पैसे दिले आणि तेथून तिची फसवणूक केली.
सुपर व्हीआयपी सदस्यत्व शुल्क
सर्वप्रथम या महिलेला व्हीआयपी सदस्यत्वाच्या नावावर आठ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. यानंतर, या महिलेला सुपर व्हीआयपी सदस्यत्वासाठी शुल्क जमा करा असे सांगितले. या बदल्यात महिलेला जास्त परतावा मिळेल, असे सांगण्यात आले.
फसवणूक करणारे एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी महिलेच्या सदस्यत्वाच्या नावाखाली 10 लाखांपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केली. त्यांनी त्या महिलेची सुमारे 10 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे समजताच संशयावरून या महिलेने पोलिसांना माहिती दिली.
असे राहा सावध