EPFO Customers Alert : एक चूक आणि झटक्यात गायब झाले 1.23 लाख रुपये, जर तुम्हीही करत असाल ‘ही’ चूक तर सावध व्हा

EPFO Customers Alert : अनेकजण PF शिल्लक तपासत असताना इंटरनेटवर आढळणाऱ्या फोन नंबरचा आधार घेतात. परंतु, अशाच नंबरचा आधार घेणाऱ्या एक व्यक्तीला लाखो रुपये गमवावे लागले आहेत.

तुम्हाला जर PF शिल्लक तपासायची असेल तर तुम्ही उमंग अॅप किंवा मेसेजद्वारे पीएफ शिल्लक तपासता येते. त्यामुळे शिल्लक तपासत असताना इंटरनेटवर आढळणाऱ्या फोन नंबरचा आधार घेणे टाळा.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

पीएफ खात्यातून ती व्यक्ती ऑनलाइन शिल्लक रक्कम तपासत होती. तपासादरम्यान, त्याला फसवणूक करणाऱ्यांनी पकडले आणि काही मिनिटातच त्या व्यक्तीच्या खात्यातून 1.23 लाख रुपये गायब केले.

अशी होती त्या व्यक्तीची चूक

या व्यक्तीने पीएफ शिल्लक रक्कम तपासण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर केला, त्याने नेटवर फोन नंबर शोधला, त्याला तो नंबर सापडला परंतु, तो नंबर बनावट होता. त्या व्यक्तीला कॉल केल्यानंतर एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले त्यानंतर त्या व्यक्तीने पुढची प्रक्रिया करून फसवणूक केली. अज्ञात व्यक्तीने त्याच्या बँक खात्यातून 1.23 लाख रुपये काढले.

लक्षात ठेवा या गोष्टी

नेटवर सापडलेले क्रमांक बनावट असू शकतात. हे कायम लक्षात ठेवाव की EPFO ​​तुम्हाला कधीच पेमेंट करण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारचे अॅप डाउनलोड करा सांगत नाही.

अशी तपासा शिल्लक

जर तुम्हाला तुमचा पीएफ बॅलन्स ऑनलाइन तपासायचे असेल तर त्यासाठी उमंग अॅप डाउनलोड करा. हे अॅप तुम्हाला पीएफ शिल्लक तपासण्याचा पर्याय देते. त्याचशिवाय तुम्ही मेसेजद्वारे पीएफ शिल्लक तपासू शकता. यासाठी ‘EPFOHO UAN ENG’ टाइप करून आणि 7738299899 वर पाठवा.