Instagram : एक चूक अन् क्षणातच रिकामे झाले बँक खाते, तुम्हीही करत नाही ना ‘या’ चुका?

Instagram : इंस्टाग्राम हे प्रसिद्ध सोशल मीडियापैकी एक आहे. परंतु, अशाच सोशल मीडियावर फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. कधीकधी आपल्या निष्काळजीपणामुळे आपल्याला खूप मोठी किंमत मोजावी लागते.

यामुळे अनेकांना लाखोंचा गंडा बसतो. असेच काहीसे एका महिलेसोबत झाले आहे. 42 वर्षीय एका महिलेला इंस्टाग्रामवर गिफ्टच्या नादात 7.35 लाख रुपयांचा फटका बसला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

असे आहे संपूर्ण प्रकरण

चेंबूरमध्ये राहणाऱ्या एका 42 वर्षीय महिलेची इंस्टाग्रामवर इग्नेशियस एनवेने नावाच्या एका व्यक्तीशी मैत्री झाली. या व्यक्तीने त्या महिलेला असे सांगितले की तो अमेरिकेत व्यवसाय करतो. सप्टेंबरपासूनच दोघांमध्ये बोलणे सुरु झाले.

त्यानंतर या व्यक्तीने महिलेला तिच्यासाठी गिफ्ट पाठवत असल्याचे सांगितले असून या वस्तूची किंमत US$ 30,000 म्हणजेच सुमारे 24.50 लाख रुपये इतकी आहे असेही सांगितले. 27 सप्टेंबर रोजी सविताला एका महिलेचा फोन आला.

त्या महिलेने आपण दिल्लीतील कस्टम विभागाकडून कॉल केला असा दावा केला. त्यानंतर त्या महिलेने सविताला ती वस्तू मंजूर करण्यासाठी 25,000 रुपयांची मागणी केली. त्यानंतर सविताने गुगलपेद्वारे पेमेंट केले. परंतु त्या महिलेने सविताला कर, क्लिअरन्स चार्जेस आणि इतर गोष्टींच्या नावाखाली आणखी काही पैशांची मागणी केली.

आणि काही क्षणातच अशा प्रकारे सविताचे बँक खाते पूर्णपणे रिकामे झाले. त्यानंतर त्या महिलेने सविताचा फोन उचलणे बंद केले आणि सविताला आपली फसवणूक झाल्याचे समजले. त्यानंतर सविताने पोलिस ठाण्यात धाव घेत त्या महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा केला.

रहा सावध

इंटरनेट वापरताना तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. कारण तुमची एक चूक तुमचे बँक खाते क्षणातच रिकामी करते. त्याचबरोबर तुमचा बँकिंग तपशील, ओटीपी आणि एटीएम पासवर्ड कोणत्याही व्यक्तीशी शेअर करू नका.

तसेच मोफत भेटवस्तूंपासून सावध रहा . त्यांना कोणतीही माहिती किंवा OTP देऊ नका. त्याचबरोबर कधीच कॉलमध्ये गिफ्ट क्लिअर करण्यास किंवा कस्टम्सच्या नावाने पैसे देण्यास सांगितले जात नाही.

त्यामुळे तुम्ही अशा कॉल आणि संदेशांकडे लक्ष देऊ नका. सोशल मीडियावरील कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका. अनपेक्षित ई-मेल, एसएमएस किंवा कोणतीही लिंक उघडू नका.