महावितरणची एक चूक आणि क्षणातच शेतकऱ्याचा 3 एकर ऊस जाळून खाक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  वीजवाहक तारांचे घर्षण होऊन निर्माण झालेल्या ठिणग्या उसाच्या पिकावर पडून जवळपास तीन एकर ऊस जाळून खाक झाला आहे. दरम्यान हि घटना कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी चिंचमळा परिसरात घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि शेतकरी भिवराज कारभारी राऊत यांनी तीन एकर क्षेत्रावर उसाची लागवड केली. कारखान्यावर ऊस विक्रीसाठी देण्यासाठी ऊसतोड करण्यातच येणार होती.

तत्पूर्वीच वीज वितरण कंपनीच्या वीजवाहक तारांचे घर्षण होऊन जाळाचा लोळ उसात पडला काही समजण्याच्या आतच उसाने पेट घेतला. दरम्यान दुसर्‍या एका शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्याला पेटलेला ऊस दिसला.

त्यांनी तात्काळ फोनवरून भिवराज राऊत व त्यांच्या मुलांना माहिती दिली. ऊस विजवण्यासाठी संजीवनीच्या अग्निशामक दलाला ही त्यांनी फोन करून बोलावून घेतले.

संजीवनी अग्निशामक दलाच्या जवानांना ऊस विसरण्यासाठी मदत केली. मात्र अधिक पेट घेतल्यामुळे हा ऊस जळून खाक झाला.

  • किंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24