धरणावर गेलेल्या चौघांपैकी एकाचा बुडुन मृत्यू..

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :-  स्वातंत्र्यदिनानिमित्त सुट्टी असल्याने या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मुळा धरणावर गेलेल्या चार तरुणांपैकी एकाच पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.

रावसाहेब भिमराज मते (वय ४०, रा. मुलनमाथा, राहुरी) असे त्याचे नाव आहे. हे सर्वजण राहुरी शहरातील एका हॉटेलमध्ये काम करत होते. काल स्वातंत्र्यदिनी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी मुळा धरणावर मोठी गर्दी केली.

त्यात, राहुरीतील एका हॉटेलमध्ये काम करणारे चारजण देखील आले होते. हे सर्वजण धरणाच्या चमेली अतिथीगृहाच्या जवळ बसून निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेत होते.

यादरम्यान बिरेंदरसिंग रावत (रा. उत्तराखंड) व रावसाहेब भिमराज मते (वय ४०, रा. मुलनमाथा, राहुरी) धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले.

परंतु धरणाच्या विस्तीर्ण व तितक्याच खोल असलेल्या पाण्यात त्यांचा दम तुटू लागला ही गोष्ट धरणात मासेमारी करणारे विकास गंगे व इंद्रजीत गंगे यांच्या लक्षात घेताच ते तात्काळ मदतीला धावले.

त्यांनी रावतला बुडतांना वाचविले. मात्रतोपर्यंत मते पाण्यात बुडाल्याचे पाहून काठावर उभे असणार्‍या त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी घाबरुन पळ काढला. यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली. याबाबत पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना घटनेची माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

अहमदनगर लाईव्ह 24