अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- एका खासगी नोकरदारावर कार्यालयात जाऊन १० जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सावेडीतील अमेझॉन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेसच्या कार्यालयात ही घटना घडली.

या हल्ल्यात अतुफ अल्लाउद्दीन शेख (वय २७ रा. फकीरवाडा, नगर) हे जखमी झाले आहेत. जखमी शेख यांनी रुग्णालयात दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलिसांनी १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या हल्लेखोरांनी कुऱ्हाड, चाकू, लोखंडी पाईप, लोखंडी रॉड, लाकडी दांडके, बेल्टच्या साहाय्याने मारहाण केली आहे. याप्रकरणी किरण पाटील, अतिश, सनी दंडवते, नितीन जाधव, अदित्य धनवडे (पूर्ण नावे, पत्ता माहिती नाही) व अनोळखी पाच इसमांचा समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, शेख हे दुचाकीवरून त्यांच्या कार्यालयातून घरी जात असताना अनुराग अपार्टमेंटसमोर शेळी आल्याने त्यांनी दुचाकी अचानक थांबवली.

त्यावेळी किरण पाटील हा त्याच्या दुचाकीवरून समोरून आल्याने तो दचकला. त्यावेळी शेख व पाटील यांच्यात शाब्दीक वाद झाले. यानंतर शेख हे त्यांचा मोबाईल घेण्यासाठी कार्यालयात गेले असता

पाटील याने इतर साथीदारांना सोबत घेऊन शेख यांच्यावर कार्यालयात हल्ला केला. कार्यालयातील साहित्यांची तोडफोड केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.