राहुरीत दर तासाला एक रुग्ण कोरोनाच्या जाळयात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  नगर जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. नागरिकांना वारंवार सूचना देऊनही नियमांचे पालन होताना दिसत नाहीये.

कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असतानाही नागरिक विनामास्क फिरत आहे. तसेच दरदिवशी कोरोनाची आकडेवारी वाढत आहे. नुकतेच राहुरी तालुक्यात गेल्या 24 तासात 25 रुग्ण हे कोरोनाबाधित आढळले आहे.

यामुळे एकच खळबळ उडाली आहे. फेब्रुवारी २०२१ पासुन राहुरी तालुक्यात पुन्हा कोरोना बाधित रूग्ण आढळून येण्यास सुरवात झाली आहे.

सोमवारी राहुरी शहरात ५ पुरूष व २ महिला, मल्हारवाडी २ पुरूष व ५ महिला,कृषी विद्यापीठ ६ पुरूष, देसवंडी, देवळाली प्रवरा, वळण प्रत्येकी १ पुरूष, राहुरी फॅक्टरी १ पुरूष व १ महिला कोरोना बाधित आढळून आले.

गेल्या महिन्याभरात बाधितांची संख्या ६८ वर पोहचली आहे. एकीकडे राहुरी तालुक्यात कोविड लसीकरणाचा प्रारंभ होत असतानाच दुसरीकडे तालुक्यात कोरोनाची वाढती आकडेवारी हि प्रशासनासाठी डोकेदुखी ठरू शकते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24