दुचाकींची समोरासमोर झालेल्या धडकेत एकजण जागीच ठार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :-जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रस्ते निर्मनुष्य असले तरी रस्त्यांवर अपघाताची मालिका सुरूच आहे.

नुकतेच नेवासा तालुक्यातील देवगाव दोन दुचाकींची समोरासमाेर धडक झाली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. दरम्यान हा भयाण अपघात शुक्रवारी (दि.१४) सकाळी दहाच्या सुमारास मुळा कालव्याजवळ घडला आहे.

या अपघातात भाऊसाहेब बबन ठोंबरे (वय ४०, रा. देवगाव, ता. नेवासा), यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अमोल नेटके हे गंभीर जखमी झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास देवगाव येथील भाऊसाहेब ठोंबरे हे दुचाकीवरून (क्र. एम. एच. १७ ए. एच ४०८८) किराणा दुकानात चालले होते. समोरून येणाऱ्या विना क्रमांकाच्या दुचाकीवरून अमोल नेटके येत होते.

मुळा कालव्याजवळ दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोराची धडक झाली. यात भाऊसाहेब ठोंबरे यांचा जागीच मृत्यू झाला.

दुसऱ्या दुचाकीवरील अमोल नेटके गंभीर जखमी झाले असून त्यांना अहमदनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कुकाणा पोलीस चौकीत अपघाताची नोंद झाली असून पोलीस कर्मचारी बी. एच. तमनर पुढील तपास करत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24