अज्ञात वाहनाच्या धडकेत एकजण गंभीर जखमी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :-दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान हा अपघात कर्जत तालुक्यातील कापरेवाडीनजीक या ठिकाणी रविवारी दुपारच्या सुमारास अपघात झाला.

या अपघातात वैजनाथ बंडगर (वय : ४५) हे जखमी झाले असून ते हंडाळवाडी येथील रहिवासी आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बंडगर हे आपल्या स्प्लेंडर गाडीवरून प्रवास करत होते.

त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. जोराच्या धडकेने ते रस्त्याच्या बाजूला कोसळले. अपघाताची माहिती मिळताच कापरेवाडी ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. रुग्णवाहिकेतून त्यांना कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24