अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या आरोपीला राहुरी ते राहुरी फॅक्टरी रोडवरील एका हॉटेलवरून श्रीरामपूर येथील एकास ताब्यात घेतले आहे.
प्रेम पांडुरंग चव्हाण असे या आरोपीचे नाव आहे. तो श्रीरामपूर येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. राहुरी कारखाना परिसरात एक व्यक्ती गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन
येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली, या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राहुरी कारखाना परिसरात असलेल्या हॉटेल साक्षी येथे सापळा रचला.
दरम्यान आरोपी प्रेम चव्हाण हा गावठी कट्टा विक्रीच्या उद्देशाने सदर हॉटेल समोर आला आणि परिसराची टेहाळणी करू करू लागला. त्याच्या संशयित हालचाली पाहून पोलिसांनी खात्री पटताच पोलिसांनी मोठ्या शिताफीने प्रेमला पकडले.