Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

OnePlus 10 Pro 5G Offer : खुशखबर! आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सवलतीत मिळतोय OnePlus 10 Pro 5G, जाणून घ्या खासियत

OnePlus 10 Pro 5G Offer : वनप्लस या दिग्ग्ज स्मार्टफोन कंपनीने काही दिवसांपूर्वी OnePlus 10 Pro 5G हा फोन लाँच केला होता. परंतु तुम्ही आता Amazon वर हा फोन खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. या स्मार्टफोनची मूळ किंमत 66,999 रुपये इतकी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तुम्ही आता Amazon च्या समर सेलमध्ये हा फोन स्वस्तात खरेदी करू शकता. या 8GB रॅम फोनवर 16% बंपर सूट मिळत आहे. मात्र लवकरात लवकर या संधीचा फायदा घ्या. कारण ही सेल काही दिवसांसाठीच असणार आहे. जाणून घ्या संपूर्ण ऑफर.

कंपनीकडून या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 प्रोसेसर देण्यात येत आहे, जो 12 GB पर्यंत RAM आणि 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजसह जोडला आहे. कंपनीला यात 5000mAh ची पॉवरफुल बॅटरी मिळत असून जी 80W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. इतकेच नाही तर हा फोन Android 12 वर आधारित ऑक्सिजन ओएसवर काम करतो.

जाणून घ्या OnePlus 10 Pro 5G ची किंमत

किमतीचा विचार केला तर OnePlus 10 Pro 5G ची किंमत 66,999 रुपये इतकी आहे, स्टोरेजचा विचार केला तर यात 8GB + 128GB स्टोरेज देण्यात आले आहे. परंतु ऑनलाइन वेबसाइट Amazon समर सेलमध्ये, हा फोन 16 टक्के सवलतीनंतर 55,999 रुपयांना खरेदी करता येत आहे.

त्यामुळे हा फोन तुम्ही 11,000 रुपयांमध्ये स्वस्तात खरेदी करू शकता. तसेच तुम्ही बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन या OnePlus फोनची किंमत आणखी 1,000 रुपयांनी कमी करू शकता. तसेच यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP फ्रंट कॅमेरा दिला आहे.

या फोनवर 27,650 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही उपलब्ध असल्याने तुम्ही एक्सचेंज आणि बँक ऑफरचा पुरेपूर फायदा घेऊन अवघ्या 27,349 रुपयात खरेदी करू शकता. या फोनमधील फोटोग्राफीसाठी, मागील बाजूस ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात 50MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 48MP प्राथमिक कॅमेरासह 8MP टेलीफोटो लेन्स यांचा समावेश असणार आहे.