Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

OnePlus 10R : खिशाला परवडणारा स्मार्टफोन! कायमचा स्वस्त झाला OnePlus 10R, कंपनीनेच किंमत केली कमी

भारतीय टेक बाजारात OnePlus 10R हा स्मार्टफोन लाँच झाल्यापासून त्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. हा फोन तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता.

OnePlus 10R : जर तुमची OnePlus चे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनीने आपल्या OnePlus 10R या स्मार्टफोनची किंमत दुसऱ्यांदा कमी केली आहे. यापूर्वीही कंपनीने स्मार्टफोनची किंमत कमी केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशातच आता पुन्हा एकदा किंमत कमी केली आहे. त्यामुळे ग्राहकांना तो खूप स्वस्तात खरेदी करता येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीने हा फोन लाँच केल्यापासून त्याने मार्केटमध्ये चांगलेच थैमान घातले आहे. कंपनीचा हा सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन आहे.

जाणून घ्या OnePlus 10R ची नवीन किंमत

OnePlus ने आपल्या OnePlus 10R या स्मार्टफोनला एकूण तीन प्रकारांमध्ये लॉन्च केले आहे. – 8GB+128GB (80W), 12GB+256GB (80W) आणि 12GB+256GB (150W). या स्मार्टफोनची किंमत ही अनुक्रमे 38,999 रुपये, 42,999 रुपये आणि 43,999 रुपये इतकी आहे.

कंपनीने पहिल्यांदा किमतीत कपात केल्यानंतर, 8GB+128GB (80W) प्रकार 34,999 रुपयांना, 12GB+256GB (80W) प्रकार 38,999 रुपयांना आणि 12GB+256GB (150W) प्रकार 39,999 रुपयांना उपलब्ध झाला होता.

कंपनीने यात आता दुसऱ्यांदा कपात केली आहे. या दुसऱ्या कपातीमुळे ग्राहकांना हे स्मार्टफोन 8GB+128GB (80W) प्रकार 31,999 रुपयांना आणि 12GB+256GB (80W) प्रकार 35,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. तर कंपनीचा 12GB + 256GB (150W) स्मार्टफोन 36,999 रुपयांना खरेदी करता येऊ शकतो. तुम्ही हा फोन सिएरा ब्लॅक आणि फॉरेस्ट ग्रीन कलर पर्यायांमध्ये खरेदी करू शकता.

पहा स्पेसिफिकेशन

कंपनीच्या OnePlus 10R मध्ये octa-core MediaTek Dimensity 8100-Max octa-core चिपसेट उपलब्ध आहे, यात 12GB पर्यंत RAM आणि 256GB अंतर्गत स्टोरेज आहे. हा स्मार्टफोन Android 13 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करत असून जो कंपनीच्या OxygenOS 13 वर आधारित आहे.

तसेच मध्यम श्रेणीच्या कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा FHD+ Fluid AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz पर्यंत व्हेरिएबल रिफ्रेश दर ऑफर करतो. ड्युअल सिम स्मार्टफोन दोन प्रकारांमध्ये येत असून यातील एक प्रकार म्हणजे एक म्हणजे 150W SuperVOOC Endurance Edition आणि दुसरा म्हणजे 80W SuperVOOC सह. हा फोन 5,000mAh बॅटरी पॅक करतो, जी 32 मिनिटांत 1 ते 100 टक्के चार्ज होते. तसेच OnePlus 10R 150W SuperVOOC Endurance Edition मध्ये 4500mAh बॅटरी देण्यात येत आहे, जी 3 मिनिटांत 1 ते 30 टक्के चार्ज होते.

तर फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये कंपनीने ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे ज्यात 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्सचा समावेश असणार आहे. याच्या फ्रंटला 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.