OnePlus : होईल हजारोंची बचत! OnePlus चा 5G फोन मिळतोय खूपच स्वस्तात, जाणून घ्या ऑफर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

OnePlus : सर्वात लोकप्रिय टेक कंपनी OnePlus पुन्हा एकदा आपल्या वेबसाइटवर शानदार ऑफर्स देत आहे. अशातच आता कंपनी तुम्ही 12 जीबी रॅम असणारा OnePlus 9 5G स्मार्टफोन मूळ किमतीपेक्षा खूपच कमी किमतीत खरेदी करू शकता.

इतकेच नाही तर कंपनी या फोनवर एकूण 2,000 रुपयांचा कॅशबॅक देत ​​आहे. या फोनची किंमत 54,999 रुपये इतकी आहे परंतु यावर सवलत मिळत असल्याने तो तुम्ही आता फक्त 42,999 रुपयांना खरेदी करू शकता. तसेच 6 महिन्यांसाठी Spotify Premium मध्ये मोफत वापरता येईल.

जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि तपशील

कंपनीचा हा फोन 2400×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.55-इंच फ्लुइड AMOLED डिस्प्लेसह येत असून त्याचा आस्पेक्ट रेशो 20:9 इतका आहे आणि तो 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. याच्या डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कंपनी या फोनमध्ये गोरिल्ला ग्लास देत आहे. स्टोरेजचा विचार केला तर हा फोन 12GB पर्यंत LPDDR5 रॅम आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेजने सुसज्ज आहे.

कंपनी हा फोन Qualcomm Snapdragon 888 चिपसेट सह येतो. या फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे असून यापैकी 48-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा तसेच 2-मेगापिक्सेल मोनोक्रोम सेन्सरसह 50-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सरचा समावेश आहे.

तसेच सेल्फीसाठी कंपनी या फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. इतकेच नाही तर या फोनला पॉवर देण्यासाठी यात 4500mAh आहे. हे 65T वार्प चार्जसह येत असून OS बद्दल बोलायचे झाल्यास हा फोन Android 11 वर आधारित ऑक्सिजन OS वर काम करतो.