Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

OnePlus Earbuds : स्वस्तात मस्त! लवकरच लाँच होणार शानदार फीचर्स असणारे इयरबड्स, बॅटरी लाईफ असणार ३६ तासांची

३६ तास बॅटरी लाइफ असणारे इयरबड्स लवकरच लाँच होणार आहे. काय असणार याची खासियत जाणून घ्या.

OnePlus Earbuds : OnePlus च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता बाजारात सतत धुमाकूळ घालत असणारी कंपनी OnePlus आपले 36 तास टिकणारे इअरबड लाँच करण्याची तयारी करत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीचे हे बजेट इयरबड्स असणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

हे बजेट इयरबड्स लॉन्च होण्यापूर्वीच याचे फीचर्स लीक झाले आहेत. हे इयरबड्स दोन रंगात सादर होणार आहे. यात नॉनस्टॉप गाणी ऐकण्याची मजा घेता येईल. इतकंच नाही तर कंपनी यात अप्रतिम गुणवत्ता देणार आहे. जाणून घ्या या इयरबड्सची किंमत आणि फीचर्स.

लवकरच OnePlus चे नवीन आणि शानदार इयरबड्स संगीत प्रेमींसाठी येत आहेत. या कंपनीने अगोदरच आपल्या अधिकृत भारत वेबसाइट आणि ट्विटरवर लॉन्चची तारीख पुष्टी केली होती. नवीन इयरबड्स OnePlus Nord Buds 2 हे लाइटनिंग व्हाईट आणि थंडर ग्रे रंगांमध्ये सादर करण्यात येणार आहे.

खासियत

हे इअरबड्स 36 तासांपर्यंत बॅटरीचे आयुष्य, ANC, 12.4mm डायनॅमिक ऑडिओ ड्रायव्हर, IP55 रेटिंग आणि जलद चार्जिंग सपोर्ट यांसारख्या फीचर्स सह येणार आहे. या इअरबड्समध्ये 4-माइक डिझाइन असून ते पाण्याच्या प्रतिकारासाठी IP55-रेट केलेले असणार आहे. या कंपनीने आगामी OnePlus Nord CE 3 Lite चे डिझाईन आणि कलर व्हेरियंटची अगोदरच माहिती दिली होती.

OnePlus Nord Buds 2 ही OnePlus Buds Ace ची रिब्रँडेड आवृत्ती असणार आहे जी मागच्या महिन्यात चीनमध्ये लॉन्च करण्यात आली होती. लॉन्च होण्यापूर्वीच इअरबड्सच्या फीचर्सचा खुलासा केला आहे. जलद चार्जिंग सपोर्टसह या इअरबड्सला ३६ तासांपर्यंत प्लेबॅक वेळ मिळतो.