OnePlus Smart TV : वनप्लसने आणली जबरदस्त ऑफर! 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येतोय स्मार्ट टीव्ही

OnePlus Smart TV : भारतीय बाजारात सध्या आपल्याला वनप्लसची क्रेझ पाहायला मिळत आहे. यामध्ये कंपनीच्या स्मार्टफोन त्याचबरोबर स्मार्ट टीव्हीला प्रचंड मागणी आहे.

वनप्लसने आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त जबरदस्त ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना स्मार्ट टीव्ही 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येतोय.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

OnePlus TV Y1S फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

वनप्लस ग्राहकांना या टीव्हीमध्ये 1366×768 पिक्सेल रिझोल्यूशनसह 32-इंचाचा डिस्प्ले देत असून टीव्हीची चित्र गुणवत्ता सुधारण्यासाठी, यात HDR10+ सोबत आवाज कमी करणे, डायनॅमिक कॉन्ट्रास्ट आणि कलर स्पेस मॅपिंग असे फीचर्स देत आहे. जर स्टोरेजचा विचार केला तर हा टीव्ही 1 GB रॅम आणि 8 GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. जबरदस्त आवाजासाठी, या टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओसह 20-वॉट स्पीकर आहेत.

या टीव्हीमध्ये बिल्ट-इन गुगल असिस्टंट आणि अलेक्सा सपोर्ट देत असून तुम्हाला बिल्ट-इन क्रोमकास्ट आणि मिराकास्ट मिळत आहे. जर OS बद्दल बोलायचे झाले तर, OnePlus चा हा TV Android 11 वर काम करतो. यामध्ये तुम्हाला प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स, यूट्यूब, हॉटस्टार, गुगल प्ले स्टोअर आणि ऑक्सिजन प्लेसह स्मार्ट मॅनेजर मिळतील.

तर कनेक्टिव्हिटीसाठी, या टीव्हीमध्ये कंपनीचे Wi-Fi, Bluetooth 5.0, दोन HDMI 2.0, एक RJ45 इथरनेट पोर्ट, एक RF कनेक्शन इनपुट, एक AV इनपुट, दोन USB 2.0 पोर्ट आणि OnePlus Connect 2.0 पोर्ट असे पर्याय उपलब्ध असणार आहेत.