OnePlus Nord 3 Smartphone : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर जरा थांबा. वनप्लसचा आणखी एक स्मार्टफोन तुम्हाला भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ घालताना दिसेल. भारतात लवकरच OnePlus Nord 3 हा फोन येणार आहे.
कंपनीचा आगामी स्मार्टफोन लाँच झाल्यानंतर इतर अनेक दिग्ग्ज स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांना टक्कर देऊ शकतो. कारण कंपनी यात अनेक जबरदस्त फीचर्स देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान हा फोन भारतात काही काळानंतर लाँच केला जाणार आहे त्यामुळे तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे.
सध्या जागतिक बाजारपेठेत वनप्लसच्या नॉर्ड 3 स्मार्टफोनची चाचणी सुरू झाली असून फोन पूर्वी अनेक सर्टिफिकेशन साइट्सवर दिसला होता, यात त्याची काही फीचर्स दर्शविली होती. कंपनी आता आणखी एक जबरदस्त स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहे.
जाणून घ्या फीचर्स
OnePlus Nord 3 मध्ये 6.7-इंच 1.5K AMOLED डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. हा फोन ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 9000 5G SoC द्वारे समर्थित असू शकतो. जागतिक बाजारपेठेत नॉर्ड 3 स्मार्टफोनची चाचणी सुरू झाली. हा फोन 80W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी युनिट पॅक करण्यासाठी सूचित करण्यात आले आहे.
या फोनमध्ये 64MP प्राथमिक लेन्स, 8MP लेन्स आणि 2MP सेन्सरसह ट्रिपल रियर कॅमेरा युनिट असेल. फोनच्या फ्रंट कॅमेरामध्ये 16MP सेन्सर असू शकते हा फोन येत्या 6 ते 8 आठवड्यांत हा फोन लॉन्च केला जाऊ शकतो.