Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

OnePlus Nord 3 : शक्तिशाली फीचर्ससह ओप्पोला टक्कर देण्यासाठी येतोय OnePlus चा आगामी फोन, जाणून घ्या किंमत

OnePlus Nord 3 : वनप्लस ही स्मार्टफोन निर्माता कंपनी दरवर्षी कितीतरी स्मार्टफोन लाँच करत असते. अशातच आता ही कंपनी आपला आगामी स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचा लवकरच OnePlus Nord 3 हा स्मार्टफोन लाँच होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सर्वात महत्वाचे म्हणजे कंपनीचा हा 5G स्मार्टफोन असणार आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. शक्तिशाली फीचर्ससह कंपनीचा आगामी फोन ओप्पोला टक्कर देईल.

या दिवशी होणार लाँच

लाँचबाबत असा अंदाज लावण्यात येत आहे की OnePlus Nord 3 5G मे ते जून दरम्यान बाजारात लॉन्च केला जाईल.

जाणून घ्या OnePlus Nord 3 5G चे फीचर्स

कंपनी या फोनमध्ये शानदार फीचर्स देण्याची शक्यता आहे. कंपनी यात 6.7-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले मिळेल, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येईल. हा फोन octa-core MediaTek Dimensity 9000 5G प्रोसेसर सह येईल. या फोनच्या स्टोरेजचा विचार केला तर यात 16GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज येईल.

कॅमेरा

यात तुम्हाला उत्तम कॅमेरा सेटअप देण्यात येईल. तसेच, यात एक ट्रिपल रिअर कॅमेरा सिस्टम उपलब्ध असणार आहे, ज्यात 64-मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर, दुय्यम अल्ट्रा-वाइड लेन्ससह 8-मेगापिक्सलचा सेन्सर तसेच तिसरा 2-मेगापिक्सेल सेन्सर यांचा समावेश असणार आहे. कंपनीच्या आगामी फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 16-मेगापिक्सलचा सेन्सर फ्रंटला मिळेल.

किती असणार किंमत?

जर किमतीबाबत बोलायचे झाले तर कंपनीकडून सध्या या फोनची किंमत जाहीर करण्यात आली नाही. परंतु कंपनी तो फोन जवळपास 30 ते 40 हजार रुपयांपर्यंत लाँच करेल.