OnePlus Nord CE 3 Lite : 108MP कॅमेरासह या दिवशी लॉन्च होणार OnePlus चा पॉवरफुल स्मार्टफोन, जाणून घ्या खासियत
जर तुम्ही OnePlus स्मार्टफोनचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच OnePlus Nord CE 3 Lite हा फोन लाँच होणार आहे.
OnePlus Nord CE 3 Lite : OnePlus आता आपला नवीन स्मार्टफोन OnePlus Nord CE 3 Lite लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी येत्या 4 एप्रिल रोजी हा आगामी स्मार्टफोन आणणार आहे. इतकेच नाही तर कंपनी या स्मार्टफोनसोबत OnePlus Nord Buds 2 हे इअरबड्स लाँच करणार आहे.
जे तुम्ही Amazon वरून सहज खरेदी करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आगामी कंपनीचा 5G स्मार्टफोन असणार आहे. कंपनी यात 108MP चा जबरदस्त कॅमेरा देणार आहे. तसेच आपल्या सर्व स्मार्टफोनप्रमाणे यात तगडे फीचर्सही देणार आहे.
कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर नवीन स्मार्टफोनचे टीझर सादर केले आहे, ज्यात या स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स उघड झाले आहेत. यात 67W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी देण्यात येणार आहे. 30 मिनिटांच्या चार्जवर एक दिवसाचा बॅटरी बॅकअप मिळू शकतो, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
किती किंमत असणार?
कंपनी आपला नवीन स्मार्टफोन 21,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन Adreno 619 GPU, 8GB RAM आणि Snapdragon 695 5G प्रोसेसरसह येऊ शकतो, ज्याला 8GB विस्तारण्यायोग्य आभासी रॅम मिळू शकते. हे लक्षात घ्या की कंपनी OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन OnePlus Nord CE 2 Lite 5G चा उत्तराधिकारी म्हणून लॉन्च करणार आहे.
तर फोटोग्राफीसाठी, कंपनीने बॅक पॅनलमध्ये 3× लॉसलेस झूम असणारा 108MP मुख्य कॅमेरा दिला आहे. तसेच यात 2MP मॅक्रो लेन्स कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर कॅमेरा देण्यात येऊ शकतो. कंपनीकडून अजूनही 2 इतर कॅमेरे आणि सेल्फी कॅमेराबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही. इतकेच नाही तर OnePlus नवीन स्मार्टफोनसोबत 4 एप्रिल रोजी आपले परवडणारे इअरबड्स ‘OnePlus Nord Buds 2’ लाँच करणार आहे.