OnePlus Offer : OnePlus ची जबरदस्त ऑफर! 9 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा ‘हे’ 5G फोन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

OnePlus Offer : जर तुम्ही OnePlus चा स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर आता तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर आहे. आता तुम्ही Nord सीरीजचे फोन 9 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत सहज खरेदी करू शकता. अशी जबरदस्त ऑफर तुमच्यासाठी Amazon वर उपलब्ध आहे.

OnePlus Nord 3 5G ऑफर

स्टोरेजचा विचार केला तर 16 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या या फोनची मूळ किंमत 43,872 रुपये आहे. जर तुमचे बजेट कमी असेल तर काळजी करू नका, कारण तुम्ही तो Amazon डीलमध्ये, ते डिस्काउंटनंतर 37,999 रुपयांत खरेदी करता येईल.

तसेच तुम्हाला एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन 29,900 रुपयांपर्यंत स्वस्त खरेदी करता येईल. समजा तुम्हाला तुमच्या जुन्या फोनचे संपूर्ण एक्सचेंज मिळाल्यास हा फोन 8,099 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ऑफरचं लाभ घेण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की एक्सचेंज बोनस तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असणार आहे. बँक ऑफरमध्ये हा फोन खरेदी करून तुम्हाला 2 हजार रुपयांचा फायदा मिळवता येईल.

याच्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर हा फोन 2772×1240 पिक्सेल रिझोल्युशनसह 6.74 इंच फुल एचडी एमोलेड डिस्प्लेसह येईल. जो 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. 16 GB पर्यंत रॅम असणाऱ्या कंपनीच्या या फोनमध्ये MediaTek Dimension 9000 चिपसेट प्रोसेसर देण्यात आला आहे.

तसेच या फोनमध्ये तुम्हाला 256 GB इंटरनल स्टोरेज पाहायला मिळेल. OnePlus चा हा फोन 50 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेराने सुसज्ज असून सेल्फीसाठी यात 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल. कंपनीचा हा फोन 5000mAh बॅटरीने सुसज्ज असून जो 80 वॉट सुपरव्हीओओसी चार्जिंगला सपोर्ट करतो.

OnePlus Nord CE 3 5G ऑफर

स्टोरेजका विचार केला तर हा फोन 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज असून त्याचंही मूळ किंमत 26,999 रुपये इतकी आहे. या फोनवर 24,900 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज डिस्काउंट देण्यात येत आहे. शिवाय तुम्हाला तुमच्या जुन्या फोनचे संपूर्ण एक्सचेंज मिळाल्यास हा फोन तुमचा सुमारे 2,000 रुपयांमध्ये असेल.

शिवाय कंपनी या स्मार्टफोनवर 1750 रुपयांपर्यंत बँक डिस्काउंटही देत असून याच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर कंपनीकडून या फोनमध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.7 इंचाचा फुल HD AMOLED डिस्प्ले देण्यात येत आहे. हा शानदार फोन Snapdragon 782G प्रोसेसरवर काम करेल. ग्राहकांना फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा मिळेल आणि या उत्तम फोनची बॅटरी 5000mAh असून जी 80 वॉट चार्जिंगला सपोर्ट करते.