OnePlus Smartphone Offer : भारतीय बाजारात सतत वनप्लसच्या स्मार्टफोनची चर्चा असते. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन आणि शानदार फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत असते. काही दिवसांपूर्वी कंपनीने आपला OnePlus Nord CE 3 Lite हा फोन लाँच केला होता.
परंतु तुमच्याकडे हा फोन मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे. तुम्ही आता हा फोन यावर मिळत असलेल्या ऑफरमुळे फक्त 1,599 रुपयांना खरेदी करू शकता. काय आहेत या ऑफर जाणून घेऊयात.
या Amazon ग्रेट सेलमध्ये, तुम्हाला आता कंपनीचा Nord CE3 Lite 5G केवळ 1,599 रुपयांमध्ये खरेदी करता येत आहे. या सेलमध्ये तुम्हाला एक्सचेंज ऑफरपासून बँक ऑफर ते कॅशबॅकपर्यंत सर्व काही दिले जात आहे. सध्या या फोनचे 8 GB RAM आणि 128 GB स्टोरेज असणारे व्हेरिएंट स्वस्तात मिळत आहे. आजपासून या सेलला सुरुवात झाली असून तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता.
किती मिळेल सवलत ?
कंपनीच्या या फोनला 19,999 रुपयांना ऑनलाइन वेबसाइट Amazon वर लिस्ट करण्यात आले आहे. तुम्ही आता ICICI क्रेडिट कार्ड वापरून EMI पर्यायाचा लाभ घेऊन हा फोन सहज खरेदी करू शकता. तसेच तुम्हाला हवे असेल तर, तुम्ही आता HSBC क्रेडिट कार्ड वापरून 250 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकेल. यासाठी तुम्हाला कमीत कमी 1000 रुपयांची खरेदी करणे गरजेचे आहे.
होणार दुहेरी फायदा
कंपनीच्या या स्मार्टफोनवर एक दोन नव्हे तर एकूण 18,400 रुपयांची एक्सचेंज सूट देण्यात येत आहे. यात तुम्ही तुमच्या जुन्या फोनची देवाणघेवाण करू शकता. परंतु यासाठी अशी एक अट आहे की तुमचा जुना फोन हा योग्य स्थितीत असावा. तुम्हाला या फोनच्या किमतीवर 18,400 रुपयांची सवलत मिळेल जर तुम्ही एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा घेतल्यास तुम्हाला हा फोन केवळ 1,599 रुपयांना खरेदी करता येईल.