OnePlus Upcoming Smartphone : 5000mAh बॅटरीसह लवकरच लॉन्च होणार OnePlus चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

OnePlus Upcoming Smartphone : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याच्या तयारीत असाल तर जरा थांबा. कारण लवकरच कंपनी आपला आगामी स्मार्टफोन लाँच करणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीचा हा फोन स्वस्त असल्याने तो तुमच्या बजेटमध्ये येऊ शकतो.

5000mAh बॅटरीसह लवकरच OnePlus चा आगामी OnePlus Nord N30 फोन सादर होणार आहे. इतकेच नाही तर लेटेस्ट फीचर्ससह हा स्मार्टफोन लॉन्च होणार आहे. मात्र तुम्हाला हा फोन लगेच खरेदी करता येणार नाही. कारण हा फोन कधी लाँच होईल हे अजूनही कंपनीने जाहीर केले नाही.

कंपनीचा आगामी फोन OnePlus Nord N30 5G स्मार्टफोन Android 13 ऑपरेटिंग सिस्टम, Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसरसह लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे. 5G नेटवर्कसह येणारा हा OnePlus फोन एक परवडणारा स्मार्टफोन आहे. स्टोरेजचा विचार केला तर कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये 8 GB रॅमसह 128 आणि 256 GB इनबिल्ट स्टोरेजचा पर्याय असू शकतो.

जाणून घ्या फीचर्स

कंपनीचा आगामी फोन गुगल प्ले कन्सोल आणि सपोर्टेड डिव्हाईसच्या लिस्टमध्ये दिसला असून या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर मिळेल. स्क्रीन 120 Hz रिफ्रेश रेटसह येऊ शकतो. तसेच या फोनमध्ये डिस्प्ले संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास उपलब्ध असणार आहे. स्क्रीन 680 nits च्या पीक ब्राइटनेस ऑफर करू शकेल. तसेच यात 8 GB रॅमसह 128 आणि 256 GB इनबिल्ट स्टोरेजचा पर्याय असणार आहे.

या स्मार्टफोनला 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा एफ/2.0 अपर्चर मिळेल. तर कनेक्टिव्हिटीसाठी, यात ड्युअल-सिम सपोर्ट, 5G, Wi-Fi 802.11 b/g/n/ac, ब्लूटूथ 5.1, GPS, 3.5mm ऑडिओ जॅक आणि टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स देण्यात येणार आहे. हा फोन 108 मेगापिक्सल प्राइमरी आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरसह येऊ शकतो. यात 5000mAh बॅटरी दिली असून जी 67W जलद चार्जिंगला समर्थन देते.