अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सुरु असलेले कांदा खरेदी विक्रीचे व्यवहार 9 तारखेपासून बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी असोसिएशने घेतला आहे.
करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान या बैठकीला व्यापारी असोसिएशचे अध्यक्ष मारुतीशेठ रेपाळे, व्यापारी किसन गंधाडे, पोपट तारडे, उत्तम गाडगे, प्रकाश भंडारी,
राजुशेठ झंजाड, चंदन भळगट, नंदकुमार देशमुख आदी सर्व व्यापारी, हमाल प्रतिनिधी उपस्थित होते. पारनेर तालुक्यात मोठया प्रमाणात रुग्ण संख्या वाढल्यामुळे बाजार समितीमध्ये काम करण्यासाठी येणारे घटकांनी कामावर येण्यासाठी असमर्थता दर्शवित आहेत.
त्यातच गेल्या दोन दिवसापासून शहर व तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्यामुळे व्यापारी असोसिएशने तातडीची बैठक घेवून 9 मे पासून कांदा खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
याबाबत व्यापारी असोसिएशन बाजार समिती प्रशासनास कळविलेले आहे. परिस्थितीमध्ये सुधारणा होताच कांदा खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्ववत सुरु करण्यात येतील. त्याबाबतची माहिती शेतकर्यांना कळविण्यात येईल असे बैठकीत निश्चित करण्यात आले आहे..