अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :- नोव्हेंबर मध्ये लागवड झालेल्या बहुतांशी कांद्याची मार्च महिन्यात विक्री झाल्याने जून महिन्यात गावरान कांद्याचे बाजारभाव तेजीत येणार आहेत. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात गावरान कांद्याच्या मोठ्या प्रमाणात लागवडी झाल्या होत्या.
डिसेंबरच्या लागवडीतून कांद्याचा ७० टक्के तर १० जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यातील कांदा लागवडीतुन ४० टक्के उतारा मिळाला.
यावर्षी खात्रीशीर कांदा बियाणांचा तुटवडा, बियाणात झालेली शेतकऱ्यांची फसवणूक, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे २० टक्के कांद्याचे नुकसान झाले.
दरवर्षी पेक्षा यंदा महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार, गुजरात राज्यात कांदा ५० टक्क्याच्या पुढे शिल्लक आहे. सर्वसाधारण एप्रिल व मे महिन्यात साऊथ इंडियाकडून कांद्याला मागणी असते.
यंदा कांद्याला संपूर्ण देशभरातून गिऱ्हाईक असल्याने जून महिन्यात गावरान कांद्याचे बाजारभाव तेजीत येणार आहेत.
महिन्याभरापूर्वी अवकाळी पाऊस व गारपिट झाल्याने कांद्याला ८०० ते ९०० रुपये क्विंटलचा बाजारभाव मिळाला होता.
मे महिन्याच्या सुरुवातीपासून ११०० ते १२०० रुपये क्विंटलचा बाजारभाव झाला. जून महिन्यात गावरान कांद्याच्या बाजारभावात तेजी येणार आहे