अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- करोनाच्या पार्श्वभुमिवर राज्यातील इतर बाजार समित्या बंद असताना राहाता बाजार समिती शेतकरी हितासाठी करोना नियमांचे काटेकोर पालन करत सुरु आहे.
कांद्याचा प्रतिक्विंटल दर :- राहाता बाजार समितीत 12 हजार 302 गोणी कांदा आवक झाली. एक नंबर कांद्याला 1 हजार ते 1500 इतका भाव प्रतिक्विंटलला मिळाला.
कांदा नं.2 ला 650 ते 950 रुपये, कांदा क्रमांक 3 ला 300 ते 600 रुपये इतका भाव मिळाला. गोल्टी कांदा 700 ते 900 रुपये, जोड कांदा 100 ते 250 रुपये असा भाव मिळाला.
डाळिंबाचा दर :- डाळिंबाची 2037 क्रेटस इतकी आवक झाली. काल एक नंबर डाळिंबाला प्रतिकिलो ला 91 ते 120 रुपये इतका भाव मिळाला.
डाळिंब नं. 2 ला प्रतिकिलोला 61 ते 90 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब नं. 3 ला प्रतिकिलोला 31 ते 60 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब नं. 4 ला 2.50 ते 30 रुपये इतका भाव प्रतिकिलोला मिळाला.
चिकूचा दर :– चिकू ची 29 क्रेटस इतकी आवक झाली. चिकुला कमीत कमी 500 व जास्तीत जास्त 1500 रुपये असा भाव मिळाला. सरासरी 1250 रुपये भाव मिळाला.
दरम्यान करोना संसर्गाची परिस्थिती भयंकर असतानाही केवळ शेतकर्यांचे नुकसान होऊ नये म्हणून राहाता बाजार समितीचे मार्गदर्शक आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे सूचनेनुसार राहाता बाजार समितीमधील सर्व प्रकारच्या शेतीमालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार दररोज चालू आहेत.