कांद्याचे दर कोसळले, कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:- कांद्याच्या बाजारभावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत 50 टक्क्यांची घसरण झाली आहे. आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत चार हजार रुपये विक्री होणाऱ्या कांद्याला 2000 ते 2200रुपये इतका सर्वसाधारण दर मिळत आहे.

लासलगाव बाजार समितीत गेल्या आठवड्यात लाल कांद्याची 50 हजार क्विंटल आवक झाली होती त्याला किमान 900 रुपये , कमाल 4390 रुपये तर सर्वसाधारण 3004 रुपये प्रति क्विंटलला बाजार भाव मिळाला होता, तर उन्हाळी कांद्याची 7 हजार क्विंटल आवक झाली होती.

त्याला किमान 911 रुपये , कमाल 4220 रुपये तर सर्वसाधारण 2684 रुपये प्रति क्विंटलला इतका बाजार भाव मिळाला होता त्या तुलनेत आज सोमवारी एक हजार रुपयांची घसरण होत लाल कांद्याला किमान 1100 रुपये , कमाल 2840 रुपये तर सर्वसाधारण 2300 रुपये तर उन्हाळ कांद्याला किमान 1000 रुपये , कमाल 2951 रुपये तर सर्वसाधारण 2350 रुपये इतका प्रतिक्विंटलला बाजार भाव मिळाला.

लासलगाव बाजार समितीत चार हजार रुपये विक्री होणाऱ्या कांद्याला 2000 ते 2200रुपये इतका सर्वसाधारण दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24