अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-गेल्या काही दिवसांपूर्वी कांद्याच्या दरात मोठी पडझड झालेली पाहायला मिळाली होती. यामुळे कांडा उत्पादाक शेतकरी मोठा चिंताग्रस्त झाला होता. मात्र नुकतेच कांद्याच्या दरात वाढ होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव घोडेगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याच्या आवक व भावात काल आणखी वाढ झाली असून काल 4200 रुपयांपर्यंत भाव निघाले.
काही वक्कलांना 4400 रुपयांपर्यंत भाव निघाला. काल 20 हजार 827 गोण्या आवक झाली. सोमवारच्या तुलनेत ती 3 हजार 256 गोण्या अधिक आहे.
काल एक नंबरच्या कांद्याला 3500 ते 4200 रुपये भाव निघाला. दोन नंबरला 2800 ते 3200 रुपये, गोल्टी कांद्याला 3000 ते 3500 रुपये तर तीन नंबरला
1000 ते 1500 रुपये भाव निघाला. घोडेगाव कांदा मार्केटमध्ये वैजापूर, पैठण, गंगापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने आवकेत वाढ झाली आहे.