Online Fraud: देशात आता स्मार्टफोनचा वापर जास्त प्रमाणात होऊ लागला आहे. आज देशातील प्रत्येक नागरिक आपल्या बँकेचे असो किंवा दुसरे कोणते काम असो सर्वकाम मोबाइलनेच करतो. आज मोबलनेच शॉपिंग होत आहे, जेवण आर्डर केले जात आहे.
चित्रपटाचे तिकीट बुक केली जात आहे. तर दुसरीकडे आपण पाहत असाल कि देशात मागच्या काही दिवसांपासून ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. हे फसवणूक करणारे लोक विविध मार्गाने तुमचे बँक खाते रिकामे करत आहेत. म्हणून आज आम्ही तुम्हाला मोबाईलमध्ये असणाऱ्या काही app बद्दल माहिती देणार आहोत जे तुम्ही पटकन तुमच्या मोबाईल मधून डिलीट करावे
कारण हे app मचा वैयक्तिक डेटा चोरून तुमच्या बँक खात्यावर लक्ष करत आहे. सायबर सिक्युरिटी कंपनी “थ्रेट फॅब्रिक” ने आपला नवीन अहवाल जारी करताना अँड्रॉइड वापरकर्त्यांना सतर्क केले आहे. हे अॅप्स थर्ड पार्टी अॅप्सवर आढळतात, ते एका लिंकवर क्लिक करून इंस्टॉल होतात आणि हळूहळू तुमच्या स्मार्टफोनची प्रायव्हसी संपवतात.
यासोबतच तुमच्या डेटाचा वापरही वाढवतो. एकाच वेळी अनेक फंक्शन्स असल्यामुळे, तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी आणि डेटा खूप लवकर संपुष्टात येतो आणि अनेकदा पॉप-अप जाहिराती येत राहतात. तुमच्या स्मार्टफोनमध्येही हे 5 अॅप इन्स्टॉल केले असतील तर ते लगेच डिलीट करा.
हे धोकादायक अॅप्स आहेत
Codice Fiscale 2022
My Finances Tracker
Zetter Authentication
File Manager Small Lite
Recover Audio Imges and Videos
हे पण वाचा :- Cheapest Electric Car: अवघ्या 4 लाख रुपयांमध्ये घरी आणा ‘ही’ जबरदस्त इलेक्ट्रिक कार! जाणून घ्या त्याची खासियत