ताज्या बातम्या

Amazon Great Republic Day Sale : उरले अवघे काही तास! स्वस्तात मिळतोय सॅमसंगचा महागडा स्मार्टफोन

Published by
Ahmednagarlive24 Office

Amazon Great Republic Day Sale : सॅमसंगच्या सर्व स्मार्टफोनने संपूर्ण मार्केट गाजवलं आहे. अशातच काही दिवसांपूर्वी लाँच झालेल्या Samsung Galaxy S20 FE 5G या स्मार्टफोननेही चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

आता याच स्मार्टफोनवर जबरदस्त सवलत मिळत आहे. ही ऑफर तुम्हाला Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये मिळत आहे. हे लक्षात घ्या की ही संधी काही तासांसाठी उपलब्ध आहे.

सध्या Amazon वर ग्रेट रिपब्लिक डे सेल सुरू असून त्यात बऱ्याच स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर मिळत आहे. यात तुम्ही आता सॅमसंग गॅलेक्सी S20 FE 5G स्मार्टफोनवर 60% फ्लॅट डिस्काउंट व्यतिरिक्त, अनेक बँक ऑफर आणि एक्सचेंज डिस्काउंट मिळत आहे. तसेच तो तुम्ही विनाखर्च EMI वर खरेदी करू शकता.

मिळत आहे जबरदस्त ऑफर

8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असणाऱ्या या बेस व्हेरिएंटची किंमत 74,999 रुपये इतकी आहे परंतु तो तुम्ही Amazon च्या सेल दरम्यान 60% सवलतीसह फक्त 29,990 वर सूचीबद्ध केला आहे.

तसेच तो तुम्ही SBI क्रेडिट कार्डने पेमेंट केले तर ग्राहकांना 10% ची त्वरित सूट मिळत आहे. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केला तर ग्राहकांना 18,050 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळेल.

त्यामुळे जर सर्व ऑफर लागू केली तर तुम्ही तो 12,000 पेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकतात. क्लाउड नेव्ही, क्लाउड ग्रीन, क्लाउड लॅव्हेंडर, ग्रीन, लव्हेंडर आणि नेव्ही अशा 6 कलर पर्यायांमध्ये खरेदी करण्यास उपलब्ध आहे.

जाणून घ्या फीचर्स

सॅमसंगचा हा स्मार्टफोन 120Hz रिफ्रेश रेट आणि FHD+ रिझोल्यूशनसह 6.5-इंचाच्या Infinity-O सुपर AMOLED डिस्प्लेसह येतो. तो म स्नॅपड्रॅगन 865 5G रेडी प्रोसेसर द्वारे समर्थित असून स्टोरेजचा विचार केला तर त्यात 8GB RAM आणि 128GB अंतर्गत स्टोरेज आहे जे नंतर  मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते. तसेच तो IP68 वॉटर आणि डस्ट रेझिस्टन्स रेटिंगसह येतो.

याच्या मागील पॅनलवरील ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये OIS सह 12MP प्राथमिक कॅमेरा, OIS सह 8MP टेलिफोटो लेन्स आणि 12MP अल्ट्रा-वाइड सेन्सरचा समावेश आहे.

तसेच यात 30X स्पेस झूम, सिंगल टेक आणि नाईट मोड सारखी भन्नाट फीचर्स कंपनीने ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहेत. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 32MP फ्रंट पंच-होल कॅमेरा आहे. फोनची 4500mAh बॅटरी सुपर फास्ट चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येते.

Ahmednagarlive24 Office