ताज्या बातम्या

केवळ राजकीय सुडातून रूग्णालयास विरोध होत असेल तर ….

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : पारनेर शहरात १ हजार १०० कोटी रुपयांचे अद्यावत रुग्णालय उभारण्याचा माझा मानस होता. परंतु या सामाजिक व विधायक उपक्रमाला विरोध व राजकारण होत असेल तर पारनेर शहर सोडून इतर ठिकाणी हे रुग्णालय स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आमदार निलेश लंके यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेे.

लंके प्रतिष्ठानला जागा देण्यावरून काल पारनेर बंद ठेवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. ते म्हणाले की, समाजासाठी विधायक व चांगल्या उपक्रमाला जर विरोध करत असतील तर हे दुर्दैव आहे.

गेल्या दोन वर्षाच्या कोरोना काळात जवळपास ३५ ते ३६ हजार रुग्णांना खडखडीत बरे केले असून दिवसभरात किमान दहा तरी रुग्ण माझ्याकडे उपचारासाठी येत असतात. त्यामुळे उपचारासाठी नगर पुण्याला जाण्याऐवजी जर पारनेर शहरात अद्यावत रुग्णालय उभारले तर आपल्या जनतेची सोय होईल.

या उदात्त हेतूने रुग्णालय उभारणाराचा आपला मानस होता. आरोग्याशी माझा जवळचा संबंध आला असून गोरगरीब व गरजू लोकांसाठी अद्यावत रुग्णालया उभारण्याचा मानस मी केला असून त्यादृष्टीने काम सुरू करणार आहे. ज्या शहरात एवढा चांगला सामाजिक उपक्रमाला विरोध होत असेल तर दुसरीकडे हे रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office