यादीत नाव असलेल्यांनाच कोविशिल्डचा दुसरा डोस मिळणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरु असताना याला अटकाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सुरु करण्यात आली आहे.

मात्र जिल्ह्यात लसीचा तुटवडा कायम आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण होत आहे. यातच ४५ वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण देखील सुरु आहे.

महापालिकेच्या वतीने कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्या ४५ वर्षांपुढील नागरिकांची यादी जाहीर केली जाणार असून, यादीत नाव असलेल्यांनाच बुधवारी डोस दिला जाईल, अशी माहिती आयुक्त शंकर गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत अधिक माहिती देताना मनपाचे आयुक्त गोरे म्हणाले, कोविशिल्डचा दुसरा डोस बुधवारी महापालिकेच्या सातही आरोग्य केंद्रांमध्ये दिला जाणार आहे.

परंतु, लसी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. त्यामुळे पहिला डोस घेतलेल्या तारखेनुसार पात्र नागरिकांची यादी तयार करण्यात आली आहे. यादीत नाव असलेल्यांना आरोग्य केंद्रातून फोन येईल.

तसेच आरोग्य केंद्राबाहेर यादी प्रसिद्ध केली जाणार असून, यादीत नाव असलेल्यांनाच फक्त दुसरा डोस दिला जाणार आहे. त्यामुळे इतरांनी आरोग्य केंद्राबाहेर गर्दी करू नये, असे आवाहन गोरे यांनी केले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24