अरेअरे! ‘तो’ स्टार्टर बंद करायला गेला मात्र परत आलाच नाही?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- विद्युत मोटारीचा ऑटो स्टार्टर बंद करण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा विजेचा शॉक बसून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथे घडली.

रविकिरण बाळासाहेब वाघ (वय ३३) असे त्या मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर असे की, श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी येथील अल्पभुधारक शेतकरी रविकिरण वाघ हे पाऊस झाल्याने आपल्या स्व:तच्या मालकीच्या शेतातील मोटारीला बसवलेला ऑटो स्टार्टर बंद करण्यासाठी सकाळी गेले.

परंतु पॅनल बोर्डमध्येच विद्युतप्रवाह उतरल्याने पॅनल बोर्ड उघडताच त्यांना जबर शॉक लागला. बराच वेळ झाला तरी पती घरी न परतल्याने त्याची पत्नी पतीला पाहण्यासाठी विहिरीकडे गेली असता.

रविकिरण हे पॅनल बोर्डजवळ पडलेल्या अवस्थेत आढळल्याने त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे शेजारीच शेतातील नातेवाईक धावत आले. रविकिरण यांना श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, लहान मुलगी, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. रविकिरण घरामध्ये एकमेव कमविता होता. त्यांच्या मृत्युमुळे कुंटूबियासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24