अरेरे! आईच्या निधनाची बातमी समजताच मुलानेही सोडले प्राण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-आजकाल आईवडीलांचा सांभाळ न करणारे अनेकजण पाहायला मिळतात मात्र आईचा मृत्यू झाल्याचे समजताच देहत्याग करणारे देखील असल्याचे समोर आले आहे.

नेवासा तालुक्यातील चांदा येथे अशीच समाजमन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. चांदा येथील यशोदाबाई भानुदास दहातोंडे (६५) यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने चौदा एप्रिल रोजी निधन झाले.

त्यांचा मुलगा शिवाजी भानुदास दहातोंडे वय (५५) यांच्या कानी ही आईच्या निधनाची बातमी समजताच त्यांनी अतिशय शोक व्यक्त केला. आईच्या निधनामुळे त्यांना अतिशय दुःख झाले. ते पोरके झाले.

लहानपणापासून आईच्या कुशीत वाढलेल्या शिवाजी यांना आईच्या शिवाय जगणे ही गोष्ट सहन झाली नाही.” उन्हाच्या भर दुपारी, फिरतो मी दारोदारी, स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी” या पंक्ती प्रमाणे त्यांना आईशिवाय जिवनजगणे अळणी आणि बेचव वाटू लागले.

आईविना जिवनात काहीच राम राहिला नाही असे वाटल्याने आईच्या शोकाने वैफल्यग्रस्त होउन त्यांनी आपली जिवनयात्रा १८ एप्रिल रोजी संपविली म्हणजे आईच्या निधनानंतर मुलाने बरोबर पाचव्या दिवशी या जगाचा कायमचा निरोप घेतला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24