Oil exports:OPEC म्हणजेच तेल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेने बुधवारी मोठा निर्णय घेतला आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढवण्यासाठी ओपेक प्लसने उत्पादनात मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
आधीच महागाई आणि मंदीच्या भीतीशी झुंजत असलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हे पाऊल आणखी एक धक्का ठरणार असल्याचा अंदाज आहे. या देशांनी उत्पादन कमी करण्यापासून परावृत्त व्हावे अशी अमेरिकेची इच्छा होती, परंतु त्यांचे ऐकले गेले नाही.
करोना संसर्ग सुरू झाल्यापासून तेल उत्पादनातील ही सर्वात मोठी कपात आहे. त्यामुळे आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरपासून दररोज २ दशलक्ष बॅरल उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जागतिक अर्थव्यवस्था कमकुवत झाल्यामुळे गेल्या काही महिन्यांत तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. तेल उत्पादक देशांना कच्च्या तेलाचा पुरवठा कमी करून भाव वाढवायचे आहेत, जेणेकरून त्यांना चांगला नफा मिळू शकेल.