उघडे ड्रेनेज ठरताहेत नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- नगर शहरातील विविध ठिकाणी गटारांची झाकणे अद्यापही उघडी व तुटलेल्या अवस्थेत असल्याने या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान ड्रेनेज दुरुस्तीकरिता मनपाकडून मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात येतो मात्र तरीही हि समस्यां कायम असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

दरम्यान शहरात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुणियासारख्या साथरोगाच्या रुग्णांची संख्या वाढत असून त्यास कारणीभूत ठरणार्‍या डासांच्या उत्पत्तीची उगमस्थाने नष्ट करण्याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अजूनही दुर्लक्ष होत आहे.

शहरातील न्यू टिळकरोड परिसरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी उघड्या ड्रेनेज असून त्यातील मैलामिश्रित पाण्याचे रस्त्यांवर डबके साठले आहे.

या डबक्यांमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, उघड्या ड्रेनेज रहदारीसाठीही धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे नागरिकांनी या ड्रेनेजच्या खड्ड्यात निषेधाचा फलक लावून आपला रोष व्यक्त केला आहे.

अनेक रस्त्यावर ड्रेनेज चोकअप होऊन मोठ्या प्रमाणात मैलामिश्रित, दुर्गंधीयुक्त पाणी वर आले असून, त्यात मोठ्या प्रमाणात डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

अनेक रस्त्यांवर खड्डे निर्माण झाले आहे. तसेच रात्री-अपरात्री वाहनचालक अथवा पादचारी या ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान नागरिकांनी महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी या खड्ड्यात मनपाच्या निषेधाचा फलक लावला आहे.