Oppo A1 5G : वनप्लसच्या अडचणी वाढणार ! अप्रतिम फीचर्ससह लवकरच लाँच होणार ओप्पोचा नवीन स्मार्टफोन, किंमतही असणार कमी
Oppo चा नवीन स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. अनेक दिवसांपासून चाहते या स्मार्टफोनची वाट पाहत होते.
Oppo A1 5G : भारतातील दिग्ग्ज टेक कंपनी Oppo सतत पुन्हा एकदा आपला नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. 12 GB रॅमसह 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असणारा ओप्पो नवीन फोन लाँच करणार आहे. लाँच झाल्यानंतर हा फोन इतर कंपन्यांच्या फोनला टक्कर देईल.
जर तुम्हाला हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला काही काळ वाट पाहावी लागणार आहे. कारण कंपनीने अजूनही लॉन्च तारखेबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. कंपनी आपल्या आगामी फोनमध्ये Oppo A1 5G शानदार फीचर्स देणार आहे.
असणारे शानदार फीचर्स
कंपनी आपल्या आगामी स्मार्टफोनमध्ये 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.72-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देत आहे. जो 90Hz च्या रिफ्रेश रेटसह येणार आहे. कंपनी आपला फोन 8 GB + 256 GB आणि 12 GB + 256 GB अशा दोन स्टोरेज प्रकारात लॉन्च करणार आहे. कंपनी फोनमध्ये 1 टीबी पर्यंत मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट देणार आहे. स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर म्हणून यात दिला जाणार आहे.
तसेच यात फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशचे दोन कॅमेरे उपलब्ध असणार आहेत. यामध्ये PDAF सह 50-मेगापिक्सेलचा मुख्य सेन्सर आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरचा समावेश असून सेल्फीसाठी, तुम्हाला यात 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळत आहे. तर कंपनी या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देत आहे. ही बॅटरी किती वॅट्सच्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करत असून याबद्दल TENAA सूचीमध्ये कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
जोपर्यंत OS चा संबंध आहे, हा फोन Android 13 आउट-ऑफ-द-बॉक्स वर काम करणार आहे. तसेच तुम्ही हा फोन Cabernet Orange, Ocean Blue आणि Sandstone Black या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकता. कंपनीच्या या फोनची सुरुवातीची किंमत भारतात 25 हजार रुपये असण्याची शक्यता आहे. कंपनी येत्या काही दिवसात या फोनबद्दल अधिकृत माहिती शेअर करणार आहे.