Oppo A1x 5G : मस्तच! ओप्पोचा सर्वात स्वस्त 5G फोन Oppo A1x 5G लॉन्च, पहा फीचर्स आणि किंमत…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Oppo A1x 5G : भारतातील दिग्ग्ज टेक कंपनी ओप्पोने आपला नवीन स्मार्टफोन Oppo A1x 5G लाँच केला आहे. ओप्पोचे चाहते अनेक दिवसांपासून या फोनची वाट पाहत होते. अखेर हा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित स्मार्टफोन लाँच झाला आहे.

कंपनीने हा फोन दोन स्टोरेज प्रकारात सादर केला आहे. कंपनीच्या 6 जीबी रॅम असणाऱ्या 128 जीबी स्टोरेजची किंमत 16,700 रुपये इतकी आहे आणि 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजची किंमत 19,100 रुपये इतकी आहे. या फोनमध्ये कोणती फीचर्स असणार? जाणून घ्या…

ओप्पोने आपला नवीन स्मार्टफोन Oppo A1x 5G 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजमध्ये सादर केला आहे. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजची किंमत 1399 चीनी युआन म्हणजे सुमारे 16,700 रुपये इतकी आहे. तसेच 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजची किंमत 1599 चीनी युआन म्हणजे सुमारे 19,100 रुपये इतकी आहे. कंपनीचा हा फोन Quiet Sea Blue आणि Starry Sky Black या दोन कलरमध्ये लॉन्च झाला आहे.

जाणून घ्या Oppo A1x 5G चे स्पेसिफिकेशन

आगामी स्मार्टफोनमध्ये 90Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.56-इंचाचा HD + IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेची कमाल ब्राइटनेस 600 nits आहे. हा फोन खूपच स्लिम असून त्यात स्क्रीन टू बॉडी रेशो 89.8 हा आहे. DCI-P3 कलर गॅमट डिस्प्लेसह समर्थित असून तो Android 12 आधारित ColorOS 12 MediaTek Dimensity 700 5G प्रोसेसरसह उपलब्ध आहे.

यामध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे ज्यात प्राथमिक लेन्स 13 मेगापिक्सेल आणि दुसरी लेन्स 2 मेगापिक्सेलची असणार आहे. या फोनच्या समोर 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. तर 5000mAh बॅटरी आणि कनेक्टिव्हिटीसाठी, Wi-Fi 5 (802.11ac) आणि GPS आहे. इतकेच नाही तर या फोनमध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि हेडफोन जॅक आहे.