Oppo A38 : शानदार ऑफर! इतक्या स्वस्तात खरेदी करा Oppo चा बजेट फोन, कसे ते जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Oppo A38 : तुम्ही आता ओप्पोच्या स्मार्टफोन खरेदीवर खूप मोठी सवलत मिळवू शकता. कारण सध्या Amazon वर एक सेल सुरु आहे. या सेलमधून तुम्हाला Oppo A38 हा स्मार्टफोन मूळ किमतीपेक्षा आणखी स्वस्तात खरेदी करता येईल.

4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असणाऱ्या या फोनची मूळ किंमत 16,999 रुपये इतकी आहे. या सेलमध्ये तुम्हाला 24% डिस्काउंट मिळेल. त्यामुळे तुम्ही हा फोन 12,999 रुपयांना खरेदी करता येईल. तसेच बँक ऑफरमध्ये फोनची किंमत 1299 रुपयांपर्यंत कमी करता येईल. एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन 11,700 रुपयांपर्यंत आणखी कमी करू शकता. या स्मार्टफोनचा EMI 630 रुपयांपासून सुरू आहे.

जाणून घ्या Oppo A38 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

Oppo A38 या फोनमध्ये 720×1612 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.56 इंच HD डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये दिलेला हा डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तर त्याची शिखर ब्राइटनेस पातळी 720 nits असून Oppo A38 या फोनचा स्क्रीन टू बॉडी रेशो 89.90% इतका आहे.

स्टोरेजचा विचार केला तर Oppo चा हा फोन 4 GB रॅम आणि 64 GB अंतर्गत स्टोरेज पर्यायात येतो. यात तुम्हाला MediaTek Helio G85 प्रोसेसर मिळेल. तसेच फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे.

यामध्ये 50-मेगापिक्सेलच्या मुख्य लेन्ससह 2-मेगापिक्सेल पोर्ट्रेट लेन्सचा समावेश करण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी फोनच्या समोर 5 मेगापिक्सेल कॅमेरा बसवला आहे. तुम्हाला या फोनमध्ये ऑफर केलेल्या फ्रंट आणि रियर कॅमेर्‍यांसह 30 fps वर 1080p व्हिडिओ शूट करता येईल.

या फोनची बॅटरी 5000mAh असून ही बॅटरी 33 वॅटच्या सुपरव्हूक चार्जिंगला सपोर्ट करते. इतकेच नाही तर साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम, Wi-Fi, GPS, 4G VoLTE, USB टाइप-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक सारखे कनेक्टिव्हिटी पर्याय देण्यात आला आहे.